संगतीचा परिणाम फक्त आपल्या शरीरावरच नव्हे तर मन व आत्म्यावरही होत असतो. म्हणूनच वाईट संगतीपासून स्वत:ला दूर राखले पाहिजे. महाभारतातील कथेवरून हे लक्षात यईल. महाभारतात युध्द संपल्यानंतर युधिष्ठीर आपल्या भावांसमवेत व द्रौपदीसहीत श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून पितामह भीष्मांच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी भीष्म शऱशय्येवर प्राणत्यागाच्य स्थितीत होते. युधिष्ठिराच्या इच्छेवरून भीष्म एका राजाने आपल्या प्रजेसाठी काय कर्तव्य पार पाडले पाहिजे याविषयी सांगू लागले. त्याचवेळी द्रौपदी मध्येच हसली. पितामहांनी कारण विचारल्यानंतर द्रौपदीने आधी माफी मागितली व म्हणाली, ज्यावेळेस कौरवांच्या सभेत माझे वस्त्रहरण केले जात असताना तुम्हाला हे धर्मज्ञान नव्हते का? हा विचार करून मी हसले.
भीष्म काही वेळ काहीच बोलले नाहीत. नंतर त्यांनी सांगावयास सुरूवात केली, धर्माबद्दलचे ज्ञान मला त्यावेळेसही होते. पण कौरवांच्या वाईट संगतीत असल्यामुळे माझी बुध्दी हीन झाली होती. आज युध्दात अर्जुनाच्या बाणांनी माझ्या शरीरातील सर्व दूषित रक्त वाहून गेले आहे. म्हणून मी आज युधिष्ठिराला धर्मज्ञान देत आहे.
थोडक्यात वाईट संगतीत राहू नये, हाच या कथेचा भावार्थ आहे. संगतीवरून आपली ओळख बनते. वाईट संगतीत इतर जण आपल्याला वाईटच समजतात. अशा लोकांसोबत आपण अन्नही ग्रहण करू नये. म्हणूनच कुसंगत हा धर्माच्या मार्गावरील सगळ्यात मोठा अडसर असतो.

Post a Comment